हिंदू धर्म शास्त्रानुसार गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा आग्रह धरणाऱ्या सनातन संस्थेने कृत्रिम तलावात गणेश मूर्तींच्या विसर्जनाला विरोध केला आहे. पुण्यात महापालिकेतर्फे विविध ठिकाणी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी विसर्जन करण्यास सनातनने विरोध केला आहे.

सनातनने नागरिकांना कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन केले आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार वाहत्या पाण्यामध्येच गणेश मूर्तींचे विसर्जन झाले पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी मूठा नदी पात्रातच गणेश मूर्तींचे विसर्जित कराव्यात असे सनातनने म्हटले आहे.

कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सनातन संस्थेचे नाव नेहमीच वेगवेगळया वादात अडकले आहे. अलीकडेच महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथे छापा मारुन बॉम्ब बनवण्याचे साहित्य, शस्त्रसाठी जप्त केला होता. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचे नाव सनातनशी जोडण्यात आले होते.