बैलगाडी शर्यत चालू करा, या मागणीसाठी पवनचक्कीच्या टॉवरवर चढून सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आंदोलन बुधवारी आंदोलन केले. दहा दिवसांत निर्णय घ्या अन्यथा मंत्री, खासदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराच या शेतकऱ्याने दिला आहे. विजय जाधव असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यत चालू करा, या मागणीसाठी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पवनचक्कीच्या टॉवरवर चढून विजय जाधव यांनी आंदोलन केले. जाधव हे मानवाधिकार संघटनेचा देखील कार्यकर्ते आहेत. पेटा हटवा, कायदा बदला, बैलगाडी शर्यत चालू करा, असा फलक गळ्यात घालून आणि रॉकेलची बाटली हातात घेऊन ते टॉवरवर चढले. यानंतर प्रशासनाची मात्र चांगलीच ताराबळ उडाली.
अग्निशामक दलाची गाडी देखील घटनास्थळी दाखल झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर आंदोलनकर्ता शेतकरी खाली उतरला आणि निवेदन देऊन त्याने आंदोलनाचा शेवट केला. दहा दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मंत्री, खासदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. जर दहा दिवसांत बैलगाडा शर्यतींवरील बंदी हटवण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत तर जिल्ह्यातील मंत्री, खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा विजय जाधव यांनी दिला आहे.