आपल्या रोखठोक भूमिकेसाठी संजय राऊत हे ओळखले जातात. प्रसंगी त्यांनी केलेल्या विधानांवरून मोठी राजकीय खळबळ देखील उडाल्याचे काही प्रसंग घडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. पण आता त्यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत हे देखील त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहे. मात्र, हे विधान राजकीय जरी असलं, तरी यामध्ये ते चक्क भाजपाला शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

शैलेश शेट्ये नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. विक्रोळीतील विधानसभा वॉर्ड क्रमांक १२०चे आपण भाजपाचे पदाधिकारी असल्याचं या व्यक्तीने आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिलं आहे. शेट्ये यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ एका जाहीर कार्यक्रमातला आहे. शिवजयंतीच्या दिवशी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते सज्जू मलिक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार सुनील राऊत यांनी हे आक्षेपार्ह विधान केलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ईडीकडून राऊत यांच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आलेल्या नोटिसा पाहाता हा व्हिडीओ ताजाच असल्याचं बोललं जात आहे.

“भाजपाचे सगळे रस्त्यावर भीक…”, संजय राऊतांनी साधला निशाणा, श्रीधर पाटणकरांवरच्या कारवाईनंतर दिली प्रतिक्रिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील राऊतांची भाजपाला शिवीगाळ!

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ३० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये सुनील राऊत भाजपाला शिवीगाळ देखील करताना दिसत आहेत. “ये * भाजपावाले ढूंढ रहे है पैसा किधर है… वो पागल *** लोग…उनको मालूम नहीं, मेरे पास पैसा नहीं है.. मेरे पास ये प्यार है.. क्या उखाडेंगे हमारा? जो करना है करो”, असं या व्हिडीओमध्ये सुनील राऊत बोलताना दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागताच त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. सुनील राऊत यांनी व्यासपीठावरून भाजपाविषयी बोलताना वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यावर आक्षेप घेतला जात आहे.