शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गट हा मांडलिक आहे. त्यांना स्वत:चं अस्तित्व नाहीये. आता शिंदे गट केवळ एक टोळी झाली आहे. अशा टोळ्या फार काळ टिकत नाहीत, त्या गँगवॉरमध्ये किंवा पोलीस चकमकीत मारल्या जातात, असं विधान संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमची टोळी नाही. आम्ही महाराष्ट्रात उठाव-क्रांती केली आहे. आमच्या टोळीचं रुपांतर कोट्यवधी लोकांमध्ये होईल. दररोज हजारो लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिंदे गटात टोळीयुद्ध सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यात गँगवॉरही होऊ शकतो”, या संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता संजय गायकवाड म्हणाले, “त्या संजय राऊताला काहीही वाटतं. आम्ही आधीपासून सांगत आहोत, आमच्यात कुठलंही टोळीयुद्ध सुरू नाही. टोळके फार काळ टिकत नाहीत, असंही राऊत म्हणाले. पण आम्ही काही टोळकं नाही. आम्ही उठाव-क्रांती केली आहे. ही क्रांती एखाद्या टोळक्याकडून होत नसते. लाखो लोकांच्या विचारातून क्रांती होते. आम्ही राज्यात क्रांती केली आहे. ते आमच्यासाठी टोळकं असा शब्द वापरत आहेत, त्यांनी असे शब्द वापरू नयेत. आज महाराष्ट्रात हजारो लोकं आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. कारण त्यांना आमचा उठाव पटलेला आहे. त्यामुळे आमच्या टोळक्याचं रुपांतर कोट्यवधी लोकांमध्ये होणार आहे,” असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला.