सर्वोच्च न्यायालय आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि इतर काही याचिकांवर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वी न्यायालयाच्या या निर्णयाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत, अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदारांवर केलेल्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा – सरकार स्थिर, समीकरणे बदलणार; राज्यातील सत्तासंघर्षांच्या निकालाचा सरकारच्या स्थैर्यावर परिणाम नाही

काय म्हणाले संजय गायकवाड?

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. संविधानिक तत्वानुसार हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागला तर मुख्यमंत्री कोण होईल, असं विचारलं असता, आमच्या विरोधात निकाल लागेल असं वाटत नाही. तरीही दुर्दैवाने असं झालंच तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Satta Sangharsh Live: निकालाच्या काही तास आधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल?

पुढे बोलताना त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदारांवर केलेल्या कारवाईवरही भाष्य केलं. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर त्यावेळी अविश्वास प्रस्ताव दाखल झालेला असल्याने त्यांना आमदारांना अपात्र करता येत नाही. अशा कारवाईसाठी ते पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी जी कारवाई केली, ती कारवाई चुकीची आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Political Crisis: अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मला वाटतंय कदाचित…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

दरम्यान, गेल्या ११ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. तसेच १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यपालांच्यावतीने वकिलांनी जोरकसपणे बाजू मांडली. आज या प्रकरणावर निकाल येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या निकालाचा राज्यातील शिंदे सरकारच्या भवितव्यावरही परिणाम होणार असल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.