नाशिकमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. याच पक्षप्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटात जे गेले त्यांची नावे कोणालाही माहिती नाहीत. दोन-चार लोक गेले असतील मात्र नाशिकमधील शिवसेना आहे तशीच आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ते आज नाशिक दौऱ्यादरम्यान माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >> “राजवस्त्र काढा, मग दाखवतो,” संजय राऊतांचे नारायण राणेंना जशास तसे उत्तर; म्हणाले “माझ्या नादाला लागू नका अन्यथा…”

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान

“नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे. दोन-चार दलाल, ठेकेदार गेले असतील. मात्र प्रत्येक शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसेना, शिवसैनिक जागेवर आहेत. शिंदे गटात कोण दाखल झालंय हे कोणालाही माहिती नाही. त्यांची नावं कोणालाही माहिती नाहीत. मेंढरं पकडायची आणि खाटिकखान्यात न्यायची, असे सुरू आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा >> “थेट शूट करण्याऐवजी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो,” सुषमा अंधारेंच्या विधानामुळे खळबळ

मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला आहे. नारायण राणे याच विधानावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. त्यांनी धाडसाच्या गोष्टी बोलाव्यात का? मी अद्याप त्यांच्याबाबत काहीच बोललेलो नाही. ते आमचे सहकारी होते. त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. हे मला तुरुंगात काय टाकणार. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने तुरुंगात गेलो आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.