संजय राऊत हा सर्वा मोठा लँड माफिया आहे. आज पुन्हा एकदा त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर आरोप केला आहे. त्यांना भाषण माफिया म्हटलं आहे. मात्र संजय राऊत हा सर्वात मोठा लँड माफिया आहे असा आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला. अलिबागमधल्या किहीम या ठिकाणी असलेली जमीन धमक्या देऊन कमी किंमतीत विकत घेतली. त्यासाठी मराठी कुटुंबाला धमक्या दिला असाही आरोप नितेश राणेंनी केला आहे.

काय म्हटलं आहे नितेश राणेंनी?

“कैदी नंबर ८९५९ ची ही इच्छा आहे की मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे कपडे फाडावे असं दिसतं आहे. कारण तो आरोप करत असेल तर मी उत्तर देत राहणार आहे. संजय राजाराम राऊत हा किती मोठा लँड माफिया आहे हे मी महाराष्ट्राला सांगतो आहे. अलिबागच्या किहीम बीचवर संजय राऊतला जागा हवी होती. त्यामुळे मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावात दमदाटी करून जागा घेतली. पुशिरकर नावाचं ते कुटुंब आहे. किहीम बीचवर रिसॉर्ट बांधण्याचे याचे मनसुबे आहेत. कोट्यवधींची जमीन अवघ्या १० कोटींमध्ये घेतली. दुसऱ्यांना माफिया बोलणारा संजय राऊत किती मोठा लँड माफिया आहे याचं उत्तर महाराष्ट्राला तू दिलं पाहिजेस. मुंबईतल्या भांडुप, विक्रोळी या भागांमध्ये आर वरून सुरु होणाऱ्या बिल्डरसोबत तुझी पार्टनरशिप आहे त्या निमित्ताने तू किती लोकांच्या जमिनी बळकवल्या आहेत?” असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे.

बेळगावच्या मराठी जनतेला आवाहन

“मी बेळगावच्या माझ्या मराठी जनतेला आवर्जून सांगेन की हा जो आरोपी कैदी नंबर ८९५९ जो तुमच्यासमोर येतो, मराठी माणसच्या हितासाठी भाषणं करतो त्याची आज कोर्टात हजेरी आहे. पत्राचाळ प्रकरणात मराठी माणसाची घरं याने लाटली आहेत. मराठी माणसाला फसवलं म्हणून त्याच्या पार्टनरसोबत कोर्टात जायचं आहे. हा जो बोंबलतो की माझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला आहे तो खोटारडा आहे. मी बेळगावच्या जनतेला सांगेन अशा दरोडेखोराला असल्या चाप्टर माणसाचं तुम्ही काही ऐकू नका ही माझी विनंती आहे. चपट्या पायाचा, घरफोड्या माणसाचं ऐकून चुकीच्या लोकांना मत देऊ नका. असल्या लोकांचं मात्र तुम्ही ऐकू नये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात विविध दंगली घडत असताना प्रतिक्रिया दिली. आमचं महायुतीचं सरकार दंगली घडवतं आहे असा आरोप त्यांनी केला आहे. त्याबाबत मी एक इतिहास उद्धव ठाकरेंना सांगणार आहे. १३ ऑगस्ट २००४ ला मातोश्रीवर एक बैठक झाली . त्या बैठकीत तुम्ही मातोश्रीवर उपस्थित होतात. उद्धव ठाकरेंनी त्या बैठीकत सांगितलं की ९२, ९३ च्या दंगली जशा घडल्या, तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी तेव्हा आदेश दिले होते की चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतल्या भागातले जे मुस्लीम फेरीवाले आहेत त्यांच्यावर वस्तरा चालवत हल्ले करायचे. त्यानंतर मुंबईत दंगली घडतील. त्या भडकवण्याची जबाबदारी माझी असेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.