विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून एकमेकांच्या विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या उबाठा गटाने महाराष्ट्रातील ४८ पैकी २३ जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. यावर शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्ष फुटला असल्यामुळे त्यांना तेवढ्या जागा देता येणार नाहीत, असे काँग्रेसने म्हटले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, “आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबर आहे.”

काय म्हणाले संजय राऊत?

“राष्ट्रीय पक्षाचे लहान-सहान निर्णय दिल्लीत घेतले जातात. आम्ही दिल्लीत इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीसाठी गेल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोललो. महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा दिल्लीत करणे सोयीचे ठरेल, अशी भूमिका आम्ही मांडली होती. खरगे यांनी आमच्या भूमिकेचे स्वागत केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी अधिकृत चर्चाच झालेली नाही, त्यामुळे कोण कुठून लढण्याची इच्छा व्यक्त करतो, यावर आज प्रतिक्रिया देणे योग्य नाही”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
Rahul Gandhi do a miracle
काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…

हे वाचा >> ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली, लोकसभेसाठी जागा वाटपाचा तिढा वाढणार?

केसी वेणूगोपाल यांनी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. त्याआधी शिवसेनेला २३ जागा का द्यायच्या? असा प्रश्न महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका मांडली.

काँग्रेसकडे शून्य खासदार – राऊत

“आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबरच आहे. शिवसेनेने याआधी २३ जागा लढवलेल्या आहेत. त्यापैकी १८ खासदार निवडून आले होते. त्या २३ जागांवर शिवसेना लढणार आहेच, ही आमची भूमिका आहे. जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू, पण काँग्रेसकडे एकतरी जिंकलेली जागा आहे का? काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची आहे. तरीही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत”, अशा शब्दात सध्या काँग्रेसकडे एकही खासदार नसल्याबाबतचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही २३ जागा लढणार आहोत, हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने सांगत आहोत. महाराष्ट्रातील काही नेते टिप्पणी करत असतील तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. शेवटी काँग्रेसचे दिल्लीतील नेते याबाबत निर्णय घेतील. तसेच वंचित बहुजन आघाडीबाबत जशी शरद पवार यांनी चर्चा केली, तशी उद्धव ठाकरे यांनीही चर्चा केली. शिवसेना आणि वंचित यांच्या आघाडीचा निर्णय आधीच झालेला आहे. पण त्यांनी महाविकास आघाडी आणि इडिया आघाडीत असावे, अशी आमची भूमिका आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

जागावाटपाबाबत समन्वय समितीची उद्या (दि. २९ डिसेंबर) बैठक होणार आहे. त्यानंतर समन्वय समिती महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करेल. जागावाटपाबाबत सध्यातरी जाहीर भाष्य करायचे नाही.