मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाची हाक दिली आहे. यासाठी मनसेने पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली. “दुसऱ्यांच्या कानपट्टीवर बंदूका ठेवायच्या आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं असं भाजपाचं सुरू आहे. भाजपाने आता दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वत:चा पक्ष उभारायला शिकावं”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या टीकेला शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले, राज ठाकरे म्हणतायत तसं काही नाही. राजकारणात काम करणारे नेते असतील, आमदार किंवा पदाधिकारी असतील, त्यांना बऱ्याचदा योग्य संधी मिळत नाही. आपल्याला संधी मिळत नसेल, आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर असे लोक इतर पक्षात जातात. याला पक्ष फोडणं म्हणत नाहीत.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात

हे ही वाचा >> “…अन् अजित पवार टुणकन तिकडे गेले”; राज ठाकरेंचा टोला, म्हणाले, “पंतप्रधानांनी…”

आमदार संजय शिरसाट म्हणाले, स्वतःहून कोणी इतर पक्षात जात असेल किंवा पक्ष काढत असेल तर त्याला पक्ष फोडणं म्हणता येणार नाही. शरद पवार यांनी स्वतःचा पक्ष का काढला? राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष का काढला? कारण, त्यांना तिथे संधी मिळत नव्हती. हे फोडाफोडीचं राजकारण नाही. तर हे आपल्यावर असलेला दबाव किंवा आपल्यावरील काम करून न देण्याची जबरदस्ती सुरू असते त्याला कंटाळून केलेली ही कृती आहे.