scorecardresearch

Premium

“संजय राऊत हे गौतमी पाटील पेक्षा फार…”, संजय शिरसाटांनी उडवली खिल्ली

नितेश राणेंनी संजय राऊतांची तुलना गौतमी पाटीलबरोबर केली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

sanjay raut sanjay shirsat
"संजय राऊत हे गौतमी पाटील पेक्षा फार…", संजय शिरसाटांनी उडवली खिल्ली

भाजपा आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्र डागलं आहे. “संजय राऊत हे सरड्यासारखं रंग बदलतात. आग लावण्याचं आणि काडी करण्याचं काम करतात. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहेत,” अशी टीका नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहे. यावर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

“संजय राऊत हे रंग बदलणारे सरडा आहेत. ते उरलेली शिवसेनेही संपवतील. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहेत. गौतमी पाटील जशी वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, ती एक उत्तर कलाकार आहे. शिवाय लोकांमध्ये ती लोकप्रिय आहे,” असं नितेश राणेंनी म्हटलं.

gunratna sadavarte on sharad pawar vaicharik virus
“जनसंघापुढे शरद पवारही चिल्लर”, गुणरत्न सदावर्तेंची सडकून टीका
Aditya thackeray
“आजोबांची पूर्ण हयात…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर भाजपा नेत्याकडून प्रत्युत्तर, म्हणाले…
jitendra awhad sharad pawar dhananjay munde
“शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगणाऱ्यांची लायकी काय?” जितेंद्र आव्हाडांचं धनंजय मुंडेवर टीकास्र
samir-choughule
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘उंदीर मांजर पकडींगो’ गाणं कसं सुचलं? समीर चौघुलेंनी सांगितली पडद्यामागची कहाणी म्हणाले, “हा बालिशपणा…”

हेही वाचा : नवनीत राणांच्या अमरावती लोकसभेसाठी बच्चू कडू आग्रही; रवी राणा म्हणाले, “आमच्या पाठीमागे…”

“संजय राऊत कोणाचीतरी सुपारी घेऊन…”

“गौतमी पाटील मनोरंजन करत असल्याने लोकांना बघायला आवडते. पण, गौतमीसारखं राऊत रोज सकाळी येऊन लोकांचं मनोरंजन करतात. कोणाचीतरी सुपारी घेऊन आग लावण्याचं काम ते करतात. हा सकाळचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे,” असं नितेश राणेंनी सांगितलं.

“गौतमी पाटील ही प्रसिद्ध आहे, ती…”

नितेश राणेंच्या विधानावर संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. “नितेश राणेंनी संजय राऊतांना गौतमी पाटील म्हणू नये. गौतमी पाटील ही प्रसिद्ध आहे. ती लोकांची करमणूक करते. पण, हा माणूस सकाळी उठून लोकांचं डोकं खराब करतो.”

हेही वाचा : गौतमी पाटीलला धमकी देणाऱ्यांसाठी मराठा सेवा संघाचे मोठे विधान; म्हणाले, “मराठा समाजाच्या मुलांनी तिच्या…”

“गौतमी पाटील आणि संजय राऊतांची तुलना…”

“गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज होतो. संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात. ही संजय राऊतांची लोकप्रियता आहे. गौतमी पाटील आणि संजय राऊतांची तुलना होऊ शकत नाही. संजय राऊत हे गौतमी पाटील पेक्षा फार छोटे आहेत,” अशी खिल्ली संजय शिरसाटांनी उडवली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay shirsat taunt sanjay raut over gautami patil nitesh rane ssa

First published on: 27-05-2023 at 14:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×