ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व नंदुरबारच्या राजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या कमलाताई मराठे (९२) यांचे निधन झाले. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या कमलाताईंनी १० वर्षांपेक्षा अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. स्वातंत्र्य लढय़ात मोठाभाऊ मराठे यांच्या बरोबरीने त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. पुत्र दिलीप मोरे? यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्य़ात विस्कटलेली राष्ट्रवादीची घडी कमलाताईंनी सावरली. वृद्धापकाळाने अनेक दिवसांपासून त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. प्रकृती साथ देत नसल्याने त्या पातोंडा येथील घरीच राहत होत्या. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या कमलाताई मराठे यांचे निधन
स्वातंत्र्य लढय़ात मोठाभाऊ मराठे यांच्या बरोबरीने त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 21-09-2015 at 04:23 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior ncp leader of the kamalatai marathe died