नांदेड: पुरूषांना घरी बोलावुन त्यांना निर्वस्त्र करून त्यांचा व्हिडीओ करून तो व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी वसुल करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. पुणे येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच तीन पुरूषांसह दोन महिलांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. हे पाचही जण पुरूषांकडे वारंवार मोठ्या रक्कमेची मागणी करीत होते.

नांदेडमध्ये एका २१ वर्षीय तरूण सेक्स एक्सटोर्शनच्या विळख्यात सापडला होता. त्याने पोलीसात धाव घेतली. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेरायांना गुन्‍हा उघडकीस करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्‍हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांची टिम तयार केली. आरोपीतांचा शोध घेत असतांना त्यांना भाग्यनगर ठाण्यातील खंडणीच्या गुन्हयातील आरोपी हे पुणे येथे पळून जाण्याचे तयारीत आहेत, अशी माहिती मिळालेवरुन त्यांना शिताफीने संशयित आरोपी विशाल हरिश कोटीयन (३३), नितीन दिनेश गायकवाड(२८), सुनिल ग्यानोबा वाघमारे (३४) , निता नितीन जोशी (२७) व राधिका रुपेश साखरे (२५) (हे सर्व जण व्यवसायाने मजुरी करत असून नांदेडमधील रहिवासी) या पाच जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता. त्यांनी नांदेडमधील कॉनल रोडवरील प्रकाश नगर येथे किरायाची खोली घेतली होती. खोलीमध्ये महिलांच्या मदतीने पुरुषांना बालावून त्यांना बळजबरीने निवस्त्र करुन, त्यांचा व्हिडीओ बनवुन, तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन पुरुषांना वारंवार मोठ्या रक्कमेची मागणी करीत होते, असे तपासात समोर आले आहे. गुन्हयातील आरोपींना पुढील तपास कामी  भाग्यनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

हेही वाचा >>>पूर्वप्राथमिक, पहिलीच्या प्रवेशासाठी नेमके वय किती? शिक्षण विभागाने दिली माहिती…

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक दतात्रय काळे, पोलीस अमलदार बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, धम्मानंद जाधव, रंनधिरसिंह राजवन्शी, गजानन बयनवाड, ज्वालासिंह बावरी, महीला अमलदार हेमलता भोयर, किरण बाबर, महजबीन शेख, चालक हनुमानसिंह ठाकुर यांनी पार पाडली.

तक्रारीसाठी पुढे या

नांदेड जिल्हयात अशा प्रकारच्या घटना कोणासोबत घडल्या असतील, अथवा अशा प्रकारची पैशाची मागणी कोणी करीत असेल तर त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.