गेल्या महिन्यात राज्यातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-भाजपा सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकास्र डागत आहेत. पण, आता पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

“शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात,” अशी टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा : “मलाही ईडीची नोटीस येऊ शकते, पण…”, रोहित पवार यांचं विधान

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या.”

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र, आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते,” असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं.