मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिवसेनेची घटना लोकशाहीविरोधी असल्याचं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “निकालावर चर्चा करता येत नाही. नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणार होत नसते. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी हा वाद झाला. तेव्हा काँग्रेसची बैलजोडी ही खूण होती ती गेली. काँग्रेसने हात घेतला, लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील. फार परिणाम होणार नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : “सूड ही दुधारी तलवार, आज तुमच्या हातात, उद्या…”, संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “रामाचा धनुष्यबाण रावणाला…”

उद्धव ठाकरेंनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. “निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु असून, आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे.”

हेही वाचा : निवडणूक आयोगाच्या निकालावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खरी शिवसेना मातोश्रीवरुन…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सहा महिने न्यायालयात लढाई सुरु आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असे बोललो होतो. पण, जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी ही भाजपाची रणनिती आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.