राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली आहे. सामान्य माणसापुढे महागाईचे संकट उभे आहे. बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाहीत. सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. देशातील तरुणांना लग्नासाठी मुली न मिळण्याचं कारणही पवारांनी सांगितलं. ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमातून शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. महाराष्ट्रातील माणूस कधीही भीक मागत नाही. महापुरुषांनी भीक मागितली, असं एका नेत्याने सांगितलं. पण महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिमतीने, कष्ट करून संकटावर मात करतो, असं विधान शरद पवारांनी केलं. सामान्य माणसाला महागाईच्या गर्तेत ढकलून देण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे, अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायची नाही, असंही पवार म्हणाले.

हेही वाचा- चंद्रशेखर बावनकुळेंकडून औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख, VIDEO शेअर करत अमोल मिटकरींचं भाजपावर टीकास्त्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या देशात बेरोजगारीच संकट आहे, लोकांना काम करण्याची संधी दिली जात नाही. तरुणांकडे नोकरी नसल्याने त्यांना लग्नासाठी मुलीही मिळत नाहीत. देशातली बेरोजगारीचा परिमाण मुलांची लग्न थांबण्यावर झाला आहे, अशी टीका शरद पवारांनी केली. दोन जाती-जातींमध्ये आणि दोन धर्मांमध्ये तेढ वाढवला जात आहे. लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी वळवण्यासाठी कधी जातीचं तर कधी धर्माच्या नावाचा वापर केला जात आहे, असंही पवार म्हणाले.