वाई : बंडखोर एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना परत शिवसेनेत येण्याचे आवाहन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील बिजवडी (ता माण) येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले हे थेट गुवाहाटीत पोहचले आहेत. ‘एकनाथ शिंदे ‘मातोश्री’ वर परत चला’ चा फलक हातात घेऊन हॉटेल रेदिसन ब्लू बाहेर उभे होते. पण, हॉटेल बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याने गुवाहाटी पोलिसांनी संजय भोसले यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नियमानुसार केल्याचे म्हटले आहे. संजय भोसले यांनी एकनाथ शिंदेंना आर्त साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या हातात “शिवनसेना जिंदाबाद! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उद्धवजी आणि आदित्यजींना साथ द्या” असा मजकूर लिहलेला फलक घेतला होता. या माध्यमातून त्यांनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेत परत येण्याचे भावनिक आवाहन केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2022 रोजी प्रकाशित
साताऱ्याचा शिवसैनिक गुवाहाटी पोलिसांच्या ताब्यात ; संजय भोसले थेट रेडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर धडकले : हातात ‘एकनाथ शिंदे परत चला’चे फलक
'एकनाथ शिंदे 'मातोश्री' वर परत चला' चा फलक हातात घेऊन हॉटेल रेदिसन ब्लू बाहेर उभे होते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 24-06-2022 at 20:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sainik of satara in custody of guwahati police zws