रायगड जिल्हय़ातील शिवसेने रवी मुंढे, दिनेश पाटील व महेंद्र दळवी असे तीन नवीन जिल्हाप्रमुख नियुक्त केले आहेत. बबन पाटील व प्रमोद घोसाळकर यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे.  रवी मुंढे यांची महाड, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत, उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राचे जिल्हाप्रमुख म्हणून दिनेश पाटील यांची, तर अलिबाग, पेण विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राचे जिल्हाप्रमुख म्हणून महेंद्र दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेंद्र म्हात्रे यांची अलिबाग, पेण विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राचे सहसंपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बबन पाटील, प्रमोद घोसाळकर, माजी आमदार देवेंद्र साटम, शिरीष बुटाला, किशोर जैन, रमेश गुडेकर, हनुमंत िपगळे, अनघा कानिटकर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena appoints three new district president in raigad
First published on: 26-01-2015 at 01:23 IST