शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत बंड करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. ४८ तासांच्या आता या आमदरांना आपले भूमिका मांडण्यास सांगितले आहे. जर आमदारांनी या वेळेत आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

हेही वाचा- शिवसेना पुन्हा उभी राहील!; उद्धव ठाकरे यांचा विश्वास, भाजपवर कारस्थानाचा आरोप

बंडखोर आमदारांना सोमवारपर्यंत वेळ

शिवसेनेकडून १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे यासाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी करण्यात आली होती. महाधिवक्ता विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांसोबत याबाबत बैठक झाली. साधारण चार तास चाललेल्या बैठकीनंतर बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. आपली भूमिका मांडण्यासाठी बंडखोर आमदरांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र, या वेळत जर त्यांनी आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल असे सावंत म्हणाले.

हेही वाचा -“हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचा भगवा सोडून कमळाबाईची साथ
तसेच बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं की नाही हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. या आमदारांचा वेगळा गट होऊ शकत नाही. त्यांना भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल. मात्र, आम्ही कट्टर शिवसैनिक असल्याची डायलॉगबाजी हे बंडखोर आमदार करत होते. पण भाजापामध्ये प्रवेश केल्यानंतर ती डायलॉगबाजी बंद होईल, असा टोला सावंत यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी त्यागेच्या भावनेने वर्षा निवासस्थान सोडले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिवसेना सोडून दूर लपून बसलेल्या त्या आमदारांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे आता त्यांना शिवसेनेचा भगवा सोडून कमळाबाईची साथ पकडावी लागेल, असा टोलाही अरविंद सावंत यांनी लगावला.