भाजपा व शिवसेनेच्या हिंदुत्वात काय आहे फरक? आदित्य ठाकरेंनी केलं स्पष्ट

भाजपाकडून होणाऱ्या आरोपांवरही दिलं स्पष्टीकरण

आदित्य ठाकरे (संग्रहित)

नुकतंच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. असं असलं तरी विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरलं असं म्हणत सरकारवर हल्लोबोलही केला. तसंच अनेकदा विरोधकांकडू शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही हल्लाबोल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं असल्याची भूमिका शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. वर्षपूर्तीनिमित्त नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

“आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळं आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझं हिंदुत्व आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपाचं हिंदुत्व राजकीय हिंदुत्व आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर ते आपल्या हिंदुत्वाला योग्य मानतात तर पीडीपी सोबत कसे गेले? आम्ही त्यांच्या सोबत होतो. परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचं हिंदुत्व? त्यांचं एका राज्यात वेगळं हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळं हिंदुत्व असतं. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- भाजपाकडून होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवर आदित्य ठाकरेंनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…

आरोपांवर स्पष्टीकरण

गेल्या एक वर्षात तुम्ही विरोधकांच्या निशाण्यावर होतात, अनेक आरोप झाले असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. “त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असल्याचा मी विचार केला. कामावर संपूर्ण लक्ष असल्याने तिकडे लक्ष गेलं नाही. महाविकास आघाडी चांगलं काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण पाच वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena leader minister aditya thackeray clafies difference between thei hundustwa and bjp hindustwa spacial interview jud

ताज्या बातम्या