शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील महाअधिवेशनात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे विधान केले होते. या विधानावर आता उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भूमिका व्यक्त केली आहे. “मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. तिथे भाजपाचे इतरही नेते होते. मात्र एकनाथ शिंदे हे पूर्णपणे भाजपाचे नोकर झाले आहेत, त्यांच्या सर्वांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत पुढे म्हणाले, २०१४ साली भाजपाने युती तोडली. पण पुढील लोकसभा निवडणुकीसाठी ते स्वबळावर जिंकू शकणार नाहीत, हे कळल्यावर स्वतः अमित शाह मातोश्रीवर कशासाठी आले? याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावे. मोदी-शाह यांच्याबरोबर राहून शिंदेंनाही खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे. मातोश्रीवर चर्चा झाल्यानंतर अमित शाह आणि भाजपाचे इतर नेते हॉटेल ब्लू सी येथे गेले. तिथे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचे वाटप ५०-५० टक्के होईल, असे विधान केले. त्यांचे विधान सार्वजनिक आहे.
‘मोदींशी बंद दाराआड चर्चा अण् उद्धव ठाकरेंना घाम फुटला’, एकनाथ शिंदेंनी सांगितला तो प्रसंग
बाळासाहेब ठाकरे असते तर…
“खोट्या शिवसेनेच्या अधिवेशनात मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर होतो. भाजपाचे अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनात होतो… काय ही लाचारी. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता. शिंदे सेनेत जोर असेल तर त्यांनी मुंबई, ठाण्याच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात मग जोर कोणाच्यात आहे, हे दाखवून देऊ”, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
मुलाचं भाषण ऐकताना वडील एकनाथ शिंदेंच्या डोळ्यांत अश्रू, म्हणाले, “श्रीकांत बोलत असताना…”
कमलनाथ यांनी काँग्रेसचा पराभव केला
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथही भाजपात जात आहेत, या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून अनेक नेते भाजपात जात आहेत. या नेत्यांनी पक्षाच्या नावावर पैसे कमवले आणि आज ईडीच्या भीतीने ते भाजपात जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव होणार नव्हता. पण कमलनाथ सारख्या लोकांनी निवडणुकीत अफरातफर केली, असा तेथील लोकांचा आरोप आहे. २०२४ मध्ये निवडणूक होईल, तेव्हा कमलनात यांची लायकी दिसून येईल, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.