दीड लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी

हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे सर्वच विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला आघाडी मिळाली आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंचं मत मशालीला नाही, मग कुणाला? उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले, “यावेळी…”
loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!
rebellion in Mahavikas Aghadi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक
Chandrapur, new voters,
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत नवमतदार, महिला मतदारांची भूमिका निर्णायक

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून हेमंत पाटील, तर काँग्रेसकडून सुभाष वानखेडे, वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड यांच्यासह २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मागील निवडणुकीत हिंगोलीची जागा मोदी लाटेत माजी खासदार राजीव सातव यांनी शिवसेनेकडून खेचून घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा राखता येणार का याची उत्सुकता मतदारांना होती.

लोकसभा मतदारसंघातून हिंगोली, कळमनुरी, वसमत, हदगाव, किनवट व उमरखेड या विधानसभेतून एक हजार ९९७ मतदान केंद्रांवर १७ लाख ३२ हजार ५४० पकी ११ लाख ५२ हजार ५४८ मतदारांनी मतदान केले होते. मतदानानंतर विजयाचे गणित मांडले जाऊ लागले. वंचित आघाडी किती मते घेणार तसेच मोदी फॅक्टर चालणार का यावरच शिवसेनेच्या विजयाचे गणित अवलंबून असल्याचे बोलले जात होते.

आज सकाळी आठ वाजल्यापासून शासकीय तंत्रनिकेतनच्या केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी दहा ते बारा हजार मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी अखेपर्यंत कायम राहिली. सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील यांना चार लाख ७८ हजार ४४९ मते मिळाली होती. काँग्रेसचे वानखेडे यांना दोन लाख ४७ हजार ७९२ मते तर वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांना एक लाख ४१ हजार ८२६ मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार संदेश चव्हाण यांना २० हजार ३०३ मते मिळाली. चार उमेदवार वगळता इतर उमेदवारांना पाचअंकीही मतदान घेता आले नाही.

हा जनतेचा विजय

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी गद्दाराला जागा दाखवली असून एका सामान्य शिवसनिकाला निवडून दिले. हा जनतेचा विजय आहे. झालेल्या निवडणुकीत शिवसनिकांनी अत्यंत प्रामाणिकपणे सच्चा सनिकाच्या विजयासाठी काम केले.

-हेमंत पाटील, शिवसेना उमेदवार