सातारा-कोयनेच्या शिवसागर जलाशयात सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन शिवप्रताप तराफा दाखल झाला आहे. या तराफ्यामुळे कोयनेतील बामणोली, तापोळा, दुर्गम कांदाटी खोऱ्यातील दळणवळण सोयीचे होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते या तराफ्याची चाचणी घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रकाश शिंदे, गटविकास अधिकारी अरूण मरभळ, तापोळ्याचे सरपंच रमेश धनावडे, योगेश गारडे, जिल्हा परिषद महाबळेश्वर व्यवस्थापक  संपत नलावडे, संतोष पवार, मंगेश माने, सुभाष कदम, सिताराम धनावडे, राहुल भोसले, गणेश भोपळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा >>> सातारा: शिव्यांच्या भडिमारात साताऱ्यातील बोरीचा बार उत्साहात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाग असलेला हा सर्व परिसर कोयनेच्या शिवसागर जलाशयामुळे दुर्गम असला, तरी निसर्गसंपन्न आहे. या भागातील बामणोली व तापोळा ही दोन महत्त्वाची बाजारपेठेची गावे आहेत. कोयनेच्या अलीकडील भागात जावली तालुक्यातील बामणोलीसह २२ गावे येतात तर कोयना,सोळशी नदीच्या संगमावर तापोळा वसलेले आहे. तापोळा हे विभागातील बाजारपेठेचे मुख्य गाव आहे. या ठिकाणी जलपर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. पश्चिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह दुर्गम व दूर असलेल्या कांदाटी खोऱ्यातील जनतेला तापोळ्याशी जोडणारी एकमेव सेवा तराफ्याची आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : “आजकाल सुपारीचा कार्यक्रम सुरू”, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

अवजड मालाची वाहने, चारचाकी वाहने नदीच्या अलीकडे-पलीकडे करण्यासाठी तराफा सेवा महत्त्वाची आहे.  तापोळा, कोळघर सोळशी व गाढवली या ठिकाणी तराफ्यातून वाहतूक करता येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन तराफ्यांची सोय.. सध्या बामणोली (पावशेवाडी) या ठिकाणी नवीन जेट्टी बांधण्यात आली असून पलीकडे दरे गावी जेट्टीचे काम झालेले नाही. दरे गावी जेट्टीचे काम झाल्यावर बामणोलीतून कांदाटी खोऱ्यात जाणे सोयीचे होणार आहे. हा नवीन तराफा जुन्या ठिकाणीच चालणार आहे. पूर्वीचा एक तराफा व नवीन एक अशा दोन तराफ्यांमुळे दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.