शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज झालं आहे. तर, शिंदे गटानेही बीकेसी मैदानावर जय्यत तयारी केली आहे. मात्र, शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून शिवसैनिकानं शिंदे गटावर टीका केली आहे.

शिवसैनिक प्रियंका जोशी यांनी बोलताना म्हणाल्या, “बीकेसीत होत असलेल्या मेळाव्याला तिथे गद्दारीची सर्दी आहे, शिवाजी पार्कवर निष्ठेची वर्दी आहे. शिवसेनेच्या मेळाव्यातून विचारांचं सोने, प्रेरणा आणि नवचैतन्य मिळते. शिंदे गटाच्या मेळाव्यात पंचपकवान आहे. मात्र, कोरोनाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंनी दिलेली शिवभोजन थाळी महत्वाची होती. आम्ही घरून ठेचा भाकरी घेऊन आलो आहोत,” असेही जोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या विचाराचे एक घाव…”; शहाजी बापू पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचा विचार…”

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या भाषणाला आठ वाजता सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बीकेसी मैदानावरील भाषण सव्वा आठ वाजता सुरु होऊ शकते.