महाविकासआघाडीत फूट नाही, आम्ही एकत्र आहोत, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महाविकासआघाडी सरकारने करोना संकटाचा सामना केला, त्यापुढे हे संकट काय आहे? असा सवालही राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरेंनी केला.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे येत्या २५ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या मुद्द्यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवस पुढे ढकलली आहे. न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. “न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी असते कारण न्यायदेवतेसमोर सर्व सारखे असतात. पण त्याचवेळेला जनता उघड्या डोळ्यांनी सर्व बघत असते” असा टोला सत्ताधाऱ्यांना ठाकरेंनी लगावला. न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे आधारस्तंभ जोपर्यंत आपल्या देशात मजबूत आहेत, तोपर्यंत या देशात लोकशाहीच राहिल, बेबंदशाही येणार नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
“ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया”, गुवाहाटीला जाण्यावरून रवी राणांचा बच्चू कडूंना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांना बजावलेल्या नोटीसा, शिवसेना नेते सुभाष देसाई, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड आदी मुद्द्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भातील पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.