देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागावे असा खोचक सल्ला शिवसेनेने दिला आहे. भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचा समचारही शिवसेनेने घेतला आहे. भय्याजी जोशी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत. या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाला गुदगुल्या झाल्या, पण महाराष्ट्रात असं काही घडणार नाही. देवेंद्रजी तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा असे आम्ही सुचवत आहोत असं शिवसेनेने म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.
हे ही वाचा: देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत- भय्याजी जोशी
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला. यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकून विधिमंडळ अधिवेशनातील त्यांच्या पक्षाची दिशा ठरवून टाकली आहे. खरंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार न घालता मुख्यमंत्र्यांशी संवाद साधयला हवा होता. त्यांनी राज्याच्या हिताच्या काही सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या असत्या. शेतकरी, कष्टकरी यांच्या मुद्द्यांवर चर्चा करायला काहीच हकरत नव्हती. मात्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आडमुठे धोरण स्वीकारले.
नागपुरात संघाचे भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधन केलं. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधात राहणार नाहीत. त्यांमच्यामागे जी माजी ही बिरुदावली तीदेखील लवकरच जाईल. असं भय्याजी जोशी म्हणाले होते. या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाला गुदगुल्या झाल्या असतीलही. पण महाराष्ट्रात असे काहीही होणार नाही. तेव्हा देवेंद्रजी आपण विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा.