शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसैनिकांनी बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला केला. याप्रकरणात ११ शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. हल्लानंतर बांगर यांनी जशास तसे उत्तर देण्याची धमकी शिवसैनिकांनी दिली होती. त्याला आता शिवसेनेनं आव्हान दिलं आहे.

संतोष बांगर हे आपल्या कुटुंबियांबरोबर अमरावतीला देवदर्शनासाठी गेले होते. तेव्हा काही शिवसैनिकांनी बांगर यांनी गाडी आडवत त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ‘माझी बहीण आणि माझी पत्नी जर माझ्यासोबत नसते तर एक घाव दोन तुकडे केले असते,’ अशी धमकीच बांगर यांनी दिली. या धमकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर सुर्यवंशी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला करावं. माझं त्यांना आव्हान आहे. तुम्ही कधी, किती लोक घेऊन येता आम्हाला सांगा. वेळ, ठिकाण आणि तारीख त्यांनी सांगावी. मग बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कोण तेव्हा तुम्हाला दाखवू. तुमच्यासारखा नाटकी माणूस उद्धव ठाकरेंजवळ रडतो. दुसऱ्या दिवशी खोके घेऊन शिंदे गटात जातो, अशा माणसाने आम्हाला निष्ठा शिकवू नये,” असेही सुर्यवंशी यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्लाप्रकरणी ११ शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर ३५३ सह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.