उद्धव ठाकरे यांची आज राजापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी सभा होणार आहे. उद्धव ठाकरे हे आमदार राजन साळवींचीही भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं जेवणही राजन साळवींच्या घरीच होणार आहे. साळवी कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंसाठी आणि रश्मी ठाकरेंसाठी स्वयंपाकाचा खास बेत आखला आहे. राजन साळवी यांनीच याविषयी माहिती दिली.

काय म्हणाले राजन साळवी?

“आज उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी घरी जेवायला येणार आहेत. त्यामुळे गोडं वरण, कोळंबी भात, मोदक, अळूवडी, डाळिंबी उसळ, काजूगराची उसळ, पुरणपोळी असा बेत आम्ही आखला आहे. कोळंबी भात वगळला तर इतर पदार्थ शाकाहारी आहेत. तसंच उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींना आमच्या घरचं जेवण आवडेल असं मला वाटतं.” असं राजन साळवींनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा प्रकारचे बॅनरही लावण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे संभाव्य लोकसभा उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामुळे बॅनरबाजीतून शक्तीप्रदर्शन केलं जातं आहे. ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. राजापुरात येणारे उद्धव ठाकरे बारसू रिफायनरीबाबत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे पण वाचा- “….आणि एका रात्रीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसला”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका

उद्धव ठाकरेंचा रत्नागिरी दौरा

सकाळी १०.०० वा. कणकवली येथून राजापूर कडे निघणार

सकाळी ११.०० वा. राजापूर जवाहर चौक येथे शिवसैनिकांशी संवाद

सकाळी ११.४५ देव धुतपापेश्वर मंदिर दर्शन व मंदिर बांधकाम पाहणी.

दुपारी १२.१५ धुतपापेश्र्वर मंदिर ते रांनतळे पावस मार्गे रत्नागिरीकडे प्रयाण

दुपारी ०९.४५ शिवसेना कार्यालय आठवडा बाजार येथे शिवसैनिकांशी संवाद

दुपारी ०२.१५ वा. आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी

दुपारी ०३.०० वा. आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थान रत्नागिरी येथून
विमानतळ रस्ता मार्गे करबुडे फाटा उक्षी – वांद्री मार्गे शास्त्री पूल ता. संगमेश्वर कडे

संध्याकाळी ०४.१५ वा. शास्त्री पूल ता. संगमेश्वर येथे शिवसैनिकांसमवेत संवाद

संध्याकाळी ०४.३० वा. शास्त्री पूल ता. संगमेश्वर येथून चिपळूण कडे

संध्याकाळी ०५.४० वा. चिपळूण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आगमन व शिवसैनिकांसोबत संवाद.

संध्याकाळी ०६.१५ वा. चिपळूण येथून खेडकडे

संध्याकाळी ७.०५ वा. २२२३० वंदेभारत एक्सप्रेसने खेड रेल्वे स्थानक येथून मुंबईकडे रवाना