शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गुरूवारी, २ नोव्हेंबर सुनावणी पार पडली. आता पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. याप्रकरणाची कागदपत्रे १६ नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे. २१ नोव्हेंबरपासून नियमितपणे सुनावणी पार पडणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवदत्त कामत म्हणाले, “२१ नोव्हेंबरपासून अपात्रतेप्रकरणी नियमीत सुनावणी पार पडणार आहे. त्यासाठी राहुल नार्वेकर वेळापत्रक जाहीर करतील. २१ नोव्हेंबरला पहिला साक्षीदार तपासला जाईल. कागदपत्रांचे पुरावे १६ तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.”

आजच्या सुनावणीला ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार सुनिल प्रभू आणि आमदार अजय चौधरी उपस्थित होते. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटात ई-मेलवरच्या व्हिपवरून जोरदार युक्तिवाद झाला.

हेही वाचा : विश्लेषण : शिवसेना कोणाची याचा निर्णय हिवाळी अधिवेशनापूर्वी शक्य?

शिंदे गटाच्या १६ आमदारांना ई-मेलच्या माध्यमातून व्हिप बजावण्यात आला होता, असा दावा ठाकरे गटानं केला. त्यासंबंधित पुरावेही ठाकरे गटानं सादर केले. पण, ज्या ई-मेलवर व्हिप पाठवण्यात आला होता, ते आपले नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला. आपल्याला व्हिपच मिळाला नाही, त्यामुळे त्याचं उल्लंघन केलं असा अर्थ होत नाही, असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं.

तुम्ही म्हणता ई-मेल दिला आहे. पण, ते म्हणतात तसं चुकीच्या ई-मेलला व्हिप पाठवण्यात आला असेल, तर उत्तर काय? असा सवाल राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या वकिलांना केला.

हेही वाचा : “आमदार अपात्रतेबाबत ३१ डिसेंबपर्यंत सुनावणी पूर्ण झाली नाही तर…”, उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर, जर आम्ही व्हिप पाठवलेला ई-मेल चुकीचा आहे, तर बरोबर कुठला, हे त्यांनी सांगावं, असा युक्तिवाद ठाकरे गटानं केला.