शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडापासून नवीन सरकार स्थापनेपर्यंत राऊतांना प्रत्येक वेळेस शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडताना पहायला मिळालं आहे. सतत आपल्या वक्तव्याने चर्चेत असणारे संजय राऊत सध्या मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. आषाढी एकादशी निमित्त त्यांनी ट्वीट करत एक खास फोटो शेअर केला आहे. सध्या या ट्वीटची चांगलीच चर्चा सुरु आहे.
संजय राऊत यांनी आषाढी एकादशीनिमित्त बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर केला आहे. फोटोत बाळासाहेब कमरेवर हात ठेऊन उभे आहेत. त्यांच्या मागे विठ्ठालाची मूर्ती आहे. या फोटोला राऊतांनी ‘विठ्ठ्ल विठ्ठ्ल’ असे कॅप्शनही दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेच माझे विठ्ठ्ल असल्याचे संजय राऊत म्हणतं असल्याचं या फोटोवरून दिसून येत आहे.
एका दगडात दोन पक्षी
४० पेक्षा जास्त शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर संजय राऊत बंडखोर आमदारांवर चांगलेच आक्रमक झाले आहे. मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती पण मी गेलो नाही, असं म्हणणारे संजय राऊत सातत्याने आपली शिवसेना पक्षासोबत आणि उद्धव ठाकरेंशी असणारी एकनिष्ठा जाणवून देत आहेत. तसेच बंडखोर आमदारांवर पक्षनिष्ठतेवरुन टीका कऱण्याची एकही संधी राऊत सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शेअर केलेला हा फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.