ठाकरे सरकार उखडून टाका म्हणणाऱ्या जे पी नड्डांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले “महाराष्ट्रात उरलेला भाजपादेखील…”

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांना दिले आहेत

Shivsena, Sanjay Raut, BJP, JP Nadda,
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांना दिले आहेत

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन जे पी नड्डा यांना सल्ला देताना राज्यातील भाजपा नेत्यांच्या नादी लागू नका, अन्यथा महाराष्ट्रात उरला-सुरला भाजपादेखील नष्ट होईल असा इशारा पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. आम्ही पाहिला तो भाजपा आणि आत्ताचा भाजपा यात जमीन अस्मानचा फरक असल्याचंही म्हटलं.

“जे पी नड्डा यांना मी कायम एक संयमी आणि सुसंस्कृत नेते म्हणून पाहिलं आहे. त्यांच्या कानात भाजपाच्या काही कपटी, कारस्थानी लोकांनी काही सांगितलं असेल तर त्यांच्या नादी लागू नये. अन्यथा महाराष्ट्रात उरला-सुरला भाजपादेखील नष्ट होईल,” असं संजय राऊत म्हणाले.

“भाजपाला आम्ही फार जवळून पाहिलं आहे. पण आम्ही तेव्हा पाहिलेला भाजपा आणि आत्ताचा भाजपा यांच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. आत्ताच्या भाजपाला कट-कारस्थानाच्या कोणत्या भूताने झपाटलं आहे हे पहावं लागले. महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा असल्याने आता आम्हाला भुत उतरवणारी लोकं कुठे सापडत नाही. पण राज्यातील जनता २०२४ मध्ये यांच्या मानेवरील चढलेली भूतं खाली उतरवतील,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena sanjay raut on bjp jp nadda mahavikas aghadi maharashtra government sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या