शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत याचा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जळगावच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवलं. जे पी नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं आहे. राजकारणात विजय आणि पराभव होत असतो, पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde in SC: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर, आजचा युक्तिवाद संपला, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न

“दोन ते तीन पातळ्यांवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण काही कमी पडणार नाही. कोर्टातही सुनावणी सुरु आहे. तिसऱी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर असून अर्ध्यात सोडू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात फक्त भाजप टिकेल! ; शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष संपण्याच्या मार्गावर असल्याच्या नड्डा यांच्या विधानाने वादंग

“आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर टीका केली. बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा डाव आखला जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सुप्रीम कोर्टात काय झालं?

राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच असून सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा केला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत उद्या म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली.