शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा कंत्राटी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने बंडखोर गटाकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं म्हटलं आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण –

“मुख्यमंत्री कोणीही असलं तरी त्यांची संदेश यंत्रणा चांगली हवी. मध्यंतरी केंद्राने एका निर्णयात कंत्राटी पद्धतीने सर्व काही करावं असं सांगितलं होतं. त्यावर मी, असं असेल तर आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही कंत्राटी पद्धतीने का नेमू नयेत अशी विचारणा केली होती. कंत्राट काढा आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान यांची नियुक्ती करा असं माझं वाक्य होतं,” असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

उद्धव ठाकरेंच्या ‘कंत्राटी मुख्यमंत्री’ टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “असंगाशी संग करण्यापेक्षा…!”

“बरं झालं माझ्यापासून दूर गेले”

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा’ असं प्रत्युत्तर दिलं असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “बरं झालं ते माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे असंगाशी जो संग होता तो गेला. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण इतर वेळी त्यांच्या हेरयंत्रणा कार्यरत असतात, त्याप्रमाणे आमच्या भाषणाचीही नीट माहिती घेऊन बोलावं”.

एकनाथ शिंदेंनी दिलं होतं प्रत्युत्तर –

दरम्यान, यावर बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं. “आज माझा उल्लेख झाला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून.. राज्याचा कुणीही मुख्यमंत्री असू द्या.. जेव्हा राणेंनी कुठेतरी भाषणात मुख्यमंत्र्यांबद्दल काहीतरी उल्लेख केला होता. त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं. केंद्रीय मंत्री असलेला माणूस. जेवायला बसला होता. त्याला जेवूही दिलं नाही. का, तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरले. आता कंत्राटी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. या देशाच्या लोकशाहीत घटनेप्रमाणे आम्ही इथे बहुमत सिद्ध करून बसलो आहोत. उगाच बसलो नाहीत. नाहीतर न्यायालयाने आम्हाला काढून टाकलं असतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

“हो, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे”

“वैचारिक पातळी एकदम खालावली आहे. घसरली आहे. हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांचं दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलंय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचंही मी कंत्राट घेतलं आहे. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा”, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला होता.

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती; उद्धव ठाकरे म्हणतात…!

“विरोधी पक्षाने मुद्दे मांडायला हवेत. राज्याच्या हिताचे मुद्दे मांडले पाहिजेत. आता विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यामुळे वैचारिक दिवाळखोरीतून केवळ हिणवणे असंच सुरू आहे. पण आम्ही त्यावर कामाने उत्तर देणार. प्रत्येकाने आपली मर्यादा सांभाळली पाहिजे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी चारोळीच्या माध्यमातून विरोधकांना खोचक टोला लगावला.