कराड : मलकापूर (ता. कराड) येथे परप्रांतीय व्यक्तींनी ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीचे आमिष दाखवून, शेकडो जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होताच संतप्त ग्राहकांनी दुकानाचे थेट शटर तोडून ताबा घेत आतील वस्तू लंपास केल्या. संतप्त ग्राहकांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत तेथील वस्तू उचलण्याची चढाओढ सुरू केली. या वेळी काहींमध्ये बाचाबाचीचा प्रसंग घडल्याचे सांगण्यात येत आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, ठकसेन परप्रांतीय दुकानदाराचा शोध सुरू आहे.
आगाशिवनगरातील वृंदावन कॉलनीत महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या ‘सोना ट्रेडर्स’ या भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात २५ ते ५० टक्के सवलतीच्या आश्वासनांवर ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेण्यात आली. मात्र, दुकान बंद आढळताच संतप्त ग्राहकांनी शटर तोडून वस्तू लुटल्या. या परप्रांतीय दुकानदाराकडून काही ग्राहकांना सुरुवातीला वस्तू देत विश्वास संपादन करण्यात आला. त्यामुळे दुकानातील वस्तूंचे आरक्षण (बुकिंग) वाढत जाऊन जवळपास आठशे जणांनी आगाऊ रक्कम जमा केली. प्रत्येक वस्तूसाठी आगाऊ रक्कम भरल्याची पावती ग्राहकांकडे उपलब्ध आहे.
गुरुवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्री ते थोडा वेळ उघडून पुन्हा बंद केल्याचे स्थानिकांनी पाहिले. शुक्रवारी सकाळी ठरलेल्या वेळेत दुकान न उघडल्याने ग्राहकांनी गर्दी केली आणि व्यापारी फरार झाल्याची शंका बळावली. त्यानंतर संतप्त ग्राहकांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत तेथील वस्तू उचलण्याची चढाओढ सुरू केली. या वेळी काहींमध्ये बाचाबाचीचा प्रसंग घडल्याचे सांगण्यात येत आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, ठकसेन परप्रांतीय दुकानदाराचा शोध सुरू आहे.