राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंटकांनी घोषणाबाजी केल्याचा दावा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भातील व्हीडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. तसंच, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्टवर म्हटलं आहे की, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंटकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंटकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही.”