अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद निवडणूक
वेगवेगळ्या कारणाने गाजत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक विभागातून सिद्धीविनायक पॅनलचे राजेंद्र जाधव, सुनील ढगे, सतीश लटके आणि श्रीपाद जोशी हे विजयी झाले. या निवडणुकीत नटराज पॅनलचे जयप्रकाश जातेगावकर, प्रशांत जुन्नरे, सुरेश गायधनी तर संजयकुमार दळवी हे उमेदवार पराभूत झाले.
नाशिक विभागातून नऊ उमेदवार रिंगणात होते. नाशिक विभागाचा निकाल विभागीय निवडणूक अधिकारी विनायक रानडे यांनी जाहीर केला. नाशिक विभागात समाविष्ट होणाऱ्या नाशिक, अहमदनगर, जळगांव, धुळे, फैजपूर व शेगांव परिसरातील सुमारे १६६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी १५९३ मतपत्रिका वैध ठरल्या तर ६७ मतपत्रिका अवैध ठरल्या.