सांगली : खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथील सिध्दनाथ मंदिरातील चांदीच्या दोन मुर्ती चोरीला जाण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. परिसराती सीसीठीव्हीच्या माध्यमातून या चोरीची उकल करून पोलीसांनी या प्रकरणी अनिल सोरटे या संशयिताला अटक केली आहे. मंगरूळ या गावी असलेल्या सिध्दनाथ मंदिरामध्ये शनिवारी सकाळी समर्थ गुरव हे पूजेसाठी गेले असताना मंदिराचे कुलुप काढून मंदिरात असलेली सिध्दनाथ आणि जोगेश्‍वरी यांच्या ८९०  ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती गायब झाल्याचे दिसले.

हेही वाचा >>> सांगलीच्या कडेगावमध्ये गॅस्ट्रोची साथ, ३६ जणांना गॅस्ट्रोची लागण, रुग्णालयात उपचार सुरु

याबाबत तात्काळ विटा पोलीसांना माहिती देण्यात आली. फिर्याद दाखल होताच पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता एक इसम पहाटे तीन ते  साडेतीन  वाजणेच्या सुमारास मंदिरातून काही  तरी घेउन जात असल्याचे दिसले. या माहितीच्या आधारे सोरटे याला ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांने मंदिरातून चोरलेल्या दोन्ही  चांदीच्या मूती र्पोलीसांच्या ताब्यात दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.