पाक्षिक सिंधुरत्न आयोजित सिंधुरत्न करंडक जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेला शनिवारी अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर प्रारंभ झाला. अलिबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे. जे. पाटील, जिल्हा पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक रवींद्र महापदी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे, पाक्षिक सिंधुरत्नचे संपादक प्रकाश सोनवडेकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पवार, माजी अध्यक्ष हर्षद कशाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलखुश क्रीडा मंडळ आवास व पंचक्रोशी बामणगाव या दोन संघांतील उद्घाटनीय सामन्याला चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून प्रारंभ झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात दिलखुश आवास संघाने पंचक्रोशी बामणगाव संघावर २७ गुणांनी सहज मात केली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2013 रोजी प्रकाशित
सिंधुरत्न करंडक महिला कबड्डी स्पर्धेला प्रारंभ
पाक्षिक सिंधुरत्न आयोजित सिंधुरत्न करंडक जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेला शनिवारी अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर प्रारंभ झाला. अलिबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

First published on: 14-04-2013 at 03:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhuratna trophy women kabaddi tournament started