scorecardresearch

‘पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा’

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा

राधाकृष्ण विखे पाटील,radhakrishna vikhe
राधाकृष्ण विखे पाटील (संग्रहित छायाचित्र)

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणी शनिवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाचे (एसआयटी) नियंत्रण न्यायालयातूनच व्हावे. सरकारकडून आत्तापर्यंत याप्रकरणाच्या तपासात अक्षम्य हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे एसआयटीतील सर्व अधिकाऱ्यांना संरक्षण पुरविण्याबरोबर तपास संपेपर्यंत या पथकातील एकाही अधिकाऱ्याची इतरत्र बदली करण्यात येऊ नये, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाची शक्यता लक्षात घेता हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2015 at 17:59 IST

संबंधित बातम्या