भारत पाकिस्तान सिमेवर पाकिस्तानी सैन्याद्वारे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील नाशिकमधील जवान केशव गोसावी शहीद झाले. जम्मूच्या नाओशेरा सेक्टरमध्ये दुपारी २ वाजून ४५ मिनीटांनी पाकिस्तानी सैन्याने गोळीबाराला सुरुवात केली. भारतीय जवानांनीही या हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राचे जवान केशव गोसावी हे जखमी झाले. मात्र सैन्याच्या रुग्णालयात उपचार घेत असताना केशव यांची प्राणज्योत मावळली. काल केशव यांच्यावर सिन्नर तालुक्यातील त्यांचे मूळगाव असणाऱ्या शिंदेवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोलताना केशव यांच्या मामांनी सीमेवर फक्त गोरगरिबांच्या मुलांनीच का मरायचं? असा सवाल उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केशव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीशी बोलताना केशव यांच्या मामांनी आपला संताप व्यक्त केला. सीमेवर फक्त गोरगरिबांच्या मुलांनीच का मरायचं?, असा सवाल करतानाच त्यांनी नेते आणि अधिकाऱ्यांच्या मुलांचे सैन्यातील योगदानावर प्रश्न उपस्थित केला. नेते आणि अधिकाऱ्यांची मुलं कधी सैन्यात भरती होणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया केशव यांच्या मामांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soldier keshav gosavi martyred in ceasefire violation by pakistan uncle raises a question
First published on: 13-11-2018 at 16:09 IST