विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे एकुलते एक पुत्र निखिल खडसे (४०) यांनी बुधवारी दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या त्यांच्या गावी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. निखिल यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. मुलाच्या आत्महत्येचा धक्का बसल्याने एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निखिल यांच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.  निखिल बुधवारी गावीच होते. एकनाथ खडसे बाहेरगावी गेले असताना दुपारी चारच्या सुमारास निखिल यांनी आपल्या खोलीत परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली.