उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांचा वाढणारा ताण लक्षात घेऊन कोकण रेल्वे महामंडळाने दादर ते सावंतवाडी या मार्गावर खास रेल्वेगाडी सुरू केली आहे.
ही गाडी दर आठवडय़ाला रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी दादरहून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचणार आहे. सावंतवाडीहून दर आठवडय़ाला सोमवार, बुधवार आणि शनिवारी ही गाडी पहाटे ५ वाजता निघून दुपारी ४ वाजता दादरला पोहोचणार आहे. मार्गावर ठाणे, पनवेल, रोहे, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ इत्यादी स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.
गेल्या रविवारपासून (२१ एप्रिल) ही गाडी सुरूझाली असून २ जूनपर्यंत ती या  मार्गावर चालू राहणार आहे.