पुण्यातील हडपसर येथील इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेत शिक्षकानेच चार ते पाच विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाला हडपसर पोलिसानी अटक केली आहे. आनंद काळे (वय 40 रा.काळेपडळ, हडपसर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील पाच महिन्यापासून हडपसर भेकराईनगर येथील ‘लेक्सिकन’ इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून असलेला आरोपी शिक्षक चार ते पाच विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे मागील पाच महिन्यापासून शाळेत आणि घरी नेऊन लैंगिक शोषण करत होता. हा प्रकार विद्यार्थ्यांनी घरी सांगितल्यावर त्यांच्या पालकांनी पोलिसांना या प्रकाराबाबत सांगितले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाळेत जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास करण्यात येत असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports teacher of school arrested from pune for sexual abuse of students
First published on: 29-10-2018 at 21:49 IST