शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घरावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा – संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, आंदोलनानंतर पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “…तर CM शिंदेंना मंत्रालयात…”; ३ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, NCP आक्रमक

“संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार कुठंही फिरले तरी, त्यांना अशाच आक्रोशाचा सामना करावा लागेल. जर राज्य सरकारने अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा घेतला नाही, तर त्यांना मंत्रालयात बसू देणार नाही. त्यामुळे अब्दुल सत्तारांनी आपले शब्द मागे घ्यावे आणि त्वरीत राजीनामा द्यावा”, अशी मागणी संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?

हेही वाचा – राज्यभरातील टीकेनंतर अब्दुल सत्तार यांची पुन्हा शिवराळ भाषा, सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना म्हणाले “मग त्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, औरंगाबादमध्ये आज एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा वापर केला होता. सुप्रिया सुळेंनी खोक्यांवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं विधान केले होते.