अमरावती : समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा दूर करण्यासाठी जीवनभर प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांचे नातू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हक्काच्या घरासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असून आपल्या वयोवृद्ध वडिलांच्या या परिस्थितीला जे. जे. धर्मशाळेचे विश्वस्त जबाबदार असल्याचा आरोप सुनीता तऱ्हेकर (रा. बेलमंडळी, ता. चांदूर बाजार) यांनी केला आहे.

संत गाडगेबाबा यांची मुलगी आलोकाबाई यांचे ९३ वर्षीय पुत्र निवृत्ती सोनवणे हे गाडगेबाबांनीच उभारलेल्या मुंबईतील जे.जे. धर्मशाळेतील एका खोलीत जीवनाची संध्याकाळ घालवत आहेत.  आई आलोकाबाई यांच्यासोबत ते धर्मशाळेच्या बाहेर एका पडवीत वास्तव्याला होते. आपल्या आजोबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून सोनवणे संस्थेत मिळेल ती कामे करून आपला सहभाग नोंदवत.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

संस्थेतील काही संधीसाधू लोकांना सोनवणे अडचणीचे ठरू लागले आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले. तेव्हापासून निवृत्ती यांची घरासाठीची वणवण थांबलेली नाही, असे सुनीता तऱ्हेकर यांनी सांगितले. आलोकाबाई यांना तीन मुले होती. त्यापैकी निवृत्ती हे एकमेव हयात आहेत. निवृत्ती यांच्या दोन मुलांपैकी गोपाल यांचा अपघाती मृत्यू झाला. त्याचा निवृत्ती यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यातून सावरत निवृत्ती हे दुसरे पुत्र राजेंद्र यांच्यासह जे.जे. धर्मशाळेच्या एका खोलीत आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत आहेत. निवृत्ती आणि त्यांच्या पत्नी अनेक वर्षे मूर्तिजापूर येथील गोरक्षणच्या एका खोलीत राहून काबाडकष्ट करून जगले. एका मिलमध्ये ते कामाला होते. मूर्तिजापूर येथील गोरक्षणमधून एक दिवस त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. १९७९ मध्ये ते मुंबईत पोहचले. त्यांना त्यावेळी जे. जे. धर्मशाळेत जिन्याखालची एक खोली मिळाली. ती खोली अत्यंत छोटी असल्याने अडचण होत होती. नंतर त्यांना खोली क्रमांक ५ मिळाली.  या खोलीचे ६ हजार २०० रुपये मासिक भाडे भरून सोनवणे कुटुंबीय आजवर तेथे राहत होते. त्यांनी ही खोली सोडावी, यासाठी अनेक प्रकारचा त्रास देण्यात आला, त्यांना अपमानित करण्यात आले. उदरनिर्वाहासाठी सोनवणे कुटुंबीयांनी अनेक छोटे-मोठे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही आडकाठी आणली गेली, असा आरोप सुनीता यांनी केला आहे. 

वंशजांवर अन्याय नाही

जे.जे. ट्रस्टवर सुनीता तऱ्हेकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. जे.जे. धर्मशाळेत केवळ बाहेरगावहून येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात दाखल असेपर्यंत निवासाची सोय उपलब्ध आहे. अन्य कोणत्याही कारणासाठी येथे राहता येणार नाही, असा करार झाला आहे. संस्थेच्या विश्वस्तांनी सोनवणे यांना मूर्तिजापूर येथे विनामूल्य खोली दिली. संस्थेने त्यांच्यावर अन्याय केलेला नाही, असे संस्थेच्या वतीने एकनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केले.