नगर: नगर शहराच्या इतिहासात प्रथमच बिबटय़ाने नागरी वस्तीमध्ये घुसून धुमाकूळ घातला. पुणे रस्त्यावरील केडगाव उपनगराच्या अंबिकानगर या दाट मध्यवस्तीच्या भागात तब्बल सहा तास बिबटय़ाने मुक्काम ठोकला होता. बिबटय़ाच्या हल्ल्यात तिघे जखमी झाले, तर या वेळी झालेल्या पळापळीमध्येही काही जण जखमी झाले. सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास सुरू झालेले हे थरार व भयनाटय़ सायंकाळी ४.३० च्या सुमारास बिबटय़ाला जेरबंद केल्यानंतर संपले आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जिल्ह्यात उसाची शेती असलेल्या उत्तर भागात अनेक वेळा बिबटय़ाने हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यात अनेकदा पशुधनाला, तर काहींना जिवाला मुकावे लागले आहे. मात्र, नगर शहरात बिबटय़ाचे अस्तित्व प्रथमच दिसले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Will Nifty touch the high mark of 25500
‘निफ्टी’ २५,५०० च्या थराची दहीहंडी फोडणार का?
Tiger, Resort, tiger enters in resort, Pench Tiger Reserve, Tourists, Madhya Pradesh, Panic, Forest Department, Wildlife,
Video : वाघाला रिसॉर्टमध्ये आली डुलकी, नंतर आले हत्ती; अखेर…
CIDCO is in the process of giving land at a strategic location in Airoli sector to a large industrial group for the construction of a township
ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण
Chandrapur, gangster, murder, Mirzapur,
चंद्रपूर की मिर्झापूर? कुख्यात गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
Sandalwood, stolen, bungalow, Prabhat Street,
पुणे : प्रभात रस्त्यावर बंगल्यात शिरून शस्त्राच्या धाकाने चंदन चोरी, चंदन चोरट्यांची दहशत
woman murder in borivali, Mumbai, MHB police, murder, KEM Hospital, Hyderabad arrest,
मुंबई : हत्या प्रकरणातील आरोपीला हैदराबाद येथून अटक

हेही वाचा >>>‘वंचित’चं महाविकास आघाडीला पत्र, म्हणाले “दोन दिवसांत…”, पत्रात नेमकं काय म्हटलंय?

बिबटय़ाच्या हल्ल्यात अरुण चौरे, दीपक धस, प्रशांत गारकर असे तिघे जखमी झाले. बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. बिबटय़ा मागे लागल्याने झालेल्या पळापळीत काहीजण धावताना पडून, कुंपणावरून उडय़ा मारताना पडून किरकोळ जखमी झाले. बिबटय़ाच्या मागे मोठा जमावही लागला होता. काही जण त्याला दगडही मारत होते. बिबटय़ाच्या मोठय़ा डरकाळय़ांनी मोठी घबराट पसरली होती. बिबटय़ा जेरबंद करण्यास उशीर झाल्याने परिसरातील प्राथमिक शाळा सोडण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच थांबून होते.केडगाव उपनगरातील शिवाजी मंगल कार्यालयामागील अंबिकानगरचा भाग स्वतंत्र बंगले व दाट वस्तीचा आहे. बंगल्यांना कुंपण आहे, तसेच आवारात मोठी झाडीही आहेत. दोन वेळा बिबटय़ा झाडावरही चढला.

हेही वाचा >>>मराठा आरक्षणासाठी लग्नाचा मुहूर्त बाजूला ठेवून वऱ्हाडींसह रास्ता रोको आंदोलनात उतरले नवरा-नवरी

अनेक तरुणांनी जाळय़ा घेऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. बिबटय़ाला लपण्यास कुंपण, झाडीचा आधार मिळत होता. तसेच जमावाच्या पळापळीमुळे तो सारखा जागा बदलत होता. त्यामुळे त्याला पकडण्यास वेळ लागत होता. संगमनेरहून आलेल्या वन खात्याच्या रेस्क्यू पथकाने त्याला भुलीचे इंजेक्शन बंदुकीच्या माध्यमातून दिले; मात्र त्यानंतरही पंधरा-वीस मिनिटे तो पळापळ करत होता. त्यामुळे दुसरे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला, मात्र नेम हुकला. अखेर तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पकडण्यात आले व पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आले.

अनेक घरांच्या दरवाजे-खिडक्या बंद

बिबटय़ाच्या दहशतीने अंबिकानगर परिसरातील अनेक कुटुंबे दरवाजा, खिडक्या बंद करून घरात बसले होते. दुकानेही बंद झाली होती. लहान मुलांना घराबाहेर सोडले जात नव्हते. बिबटय़ाच्या मागे लागलेल्या जमावावरील नियंत्रणासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेक तरुण इमारतीच्या छतावर जाऊन रस्त्यावरून पाळणाऱ्या बिबटय़ाचे थरारनाटय़ पाहत होते.बिबटय़ा जेरबंद होताच जमलेल्या नागरिकांनी मोठा जल्लोष केला. उपवनसंरक्षण अधिकारी सुवर्णा माने व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा नागरिकांनी सत्कारही केला.

शहरी भागाच्या लोकवस्तीत बिबटय़ा आल्याने नगरसह राहुरी, तिसगाव, संगमनेर येथील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाचारण करण्यात आले होते. पकडलेला बिबटय़ा नर जातीचा, ७ ते ८ वर्षांचा आहे. उसाची सध्या तोडणी सुरू आहे. त्यामुळे आणि भक्ष्याच्या शोधार्थ बिबटय़ा नागरी वस्तीमध्ये येत आहे. पकडलेल्या बिबटय़ाची वैद्यकीय तपासणी करून तो जखमी झाला आहे का हे तपासले जाईल. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. –सुवर्णा माने, उपवन संरक्षण अधिकारी नगर

वन्य प्राणी जेव्हा नागरी वस्तीमध्ये येतात, त्या वेळी नागरिकांनी घाबरून गोंधळ न करता, स्वयंनियंत्रण ठेवावे. गोंधळामुळे, आरडाओरड केल्याने वन्य प्राण्यांना व इतरांनाही त्रास होतो. नागरी वस्तीत आलेल्या बिबटय़ाला वन विभागाने सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे. –प्रताप दराडे,  पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे, नगर

केडगाव उपनगरात बिबटय़ा आल्याची माहिती वन विभागाला सकाळी ११.३० च्या सुमारास कळवली होती. परंतु वन विभागाचे पथक दोन तासांनी आले. त्यानंतर रेस्क्यू टीम आली. ते वेळीच आले असते, तर तीन नागरिक जखमी झाले नसते. – अमोल येवलेमाजी नगरसेवक, केडगाव