राज्यातील अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याचा दावा करत विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं आहे. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारा रोजगार गेला, तसंच, महाराष्ट्राचंही अतोनात आर्थिक नुकसान झालं”, असा दावा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही तमिळनाडूत गेलेल्या एका उद्योगाबाबत ट्वीट करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

हेही वाचा >> Video : “कोण संजय राऊत?”, भर पत्रकार परिषदेत अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रश्न; नेमकं काय घडलं वाचा

नाइकी, आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन ही कंपनी भारतात तमिळनाडूमध्ये २३०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. “२३०० कोटी गुंतवणुकीचा आणि २० हजार युवांना रोजगार देणारा पो चेन कंपनीचा प्रकल्प खेचून आणणल्याबाद्दल तमिळनाडू सरकारचे अभिनंदन,” असं म्हणत रोहित पवारांनी महाराष्ट्र सराकरावर खोचक टीका केली आहे. “महाराष्ट्राबद्दल अशा बातम्या दिसत नसल्याने तमिळनाडू सरकारचं अभिनंदन करताना त्यांचा हेवा आणि ईर्ष्याही वाटतेय आणि आपलं राज्य मागं पडत असल्याचं दुःखंही होतंय”, असं रोहित पवारांनी ट्वीट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पो चेन ही तैवानमधील पादत्राणे उत्पादन करणारी कंपनी असून या कंपनीकडून तमिळनाडूमध्ये २३०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. नाइकी, आदिदास, टिंबरलँड आदी अग्रगण्य फूट वेअर कंपन्यांसाठी पो चेन ही कंपनी उत्पादन करते. या कंपनीने जवळपास २७२ मिलिअनपेक्षाही अधिक पादत्राणे २०२२ मध्ये जागतिक स्तरावर विकल्या होत्या. बांगलादेश, कम्बोडिया, म्यानमार आणि व्हिएतनाम येथे या कंपनीचे प्लांट्स आहेत. बिझनेस टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.