मागील काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या कपड्यांवरून मोठा वाद सुरू आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कारवाई करावी तसेच मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असलेला नंगानाच थांबवावा अशी मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर महिला आयोगाने त्यांना नोटीस दिली. या नोटिशीनंतर हा वाद जास्तच चिघळला आहे. दरम्यान, याच प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मध्यस्थी करावी अशी विनंती केली आहे. यावरही चित्रा वाघ यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांचा वादात आता सुप्रिया सुळे आणि चित्रा वाघ आमनेसामने आल्या आहेत.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी अनेक महिलांवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा वाद थांबवावा अशी मागणी केली आहे. “देवेंद्र फडणीस यांना मी विनंती करते की उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा. महाविकास आघाडीकडून आम्ही पुढाकार घेऊ. महिला आयोगाच्या अध्यक्षा काही करत नाहीयेत. जशी त्यांच्या घरात एक मुलगी आहे, तशीच त्यांच्याही घरात एक मुलगी आहे. अनेक महिलांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे आपले काम नाही. महिला आयोग त्यांच्या नियमांप्रमाणे काम करेल. त्याविषयी चर्चा कशाला करायची,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

आणखी वाचा – उर्फी जावेद प्रकरण : चित्रा वाघ आणि चाकणकरांमध्ये वाद चिघळला, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

नंगानाच सुप्रिया सुळे यांना मान्य आहे का- चित्रा वाघ

तर सुप्रिया सुळे यांच्या याच विधानानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच सल्ले द्यावेत, अशा शब्दांत टीका केली आहे. “सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी महिला आयोगावर ज्यांची नेमणूक केली आहे, त्या बाष्कळ विधाने करत आहेत. अगोदर त्यांना सांगा. सुप्रिया यांनी एक लक्षात घ्यावे की आम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांना गूळ खोबरे देऊन आमंत्रण दिले नव्हते. मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असलेला नंगानाच सुप्रिया सुळे यांना मान्य आहे का. त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत. त्यांनी महिला आयोगच्या अध्यक्ष असलेल्यांना सल्ले दिले पाहिजेत. आमचा आक्षेप महिला आयोगाला नाही. महिला आयोगाच्या चुकीच्या कार्यपद्धतीला आमचा आक्षेप आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही पाहा – Video: “कमी कपडे घालणं हा माझा…” उर्फी जावेदचा मोठा खुलासा

कोणी कोणते कपडे परिधान करावेत, ज्याचे त्याने ठरवावे- रुपाली चाकणकर

“प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातूनही कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला, तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांनाही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही,” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.

आणखी वाचा – जावेद अख्तर यांना भेटल्यावर उर्फीने त्यांच्याकडे मागितली ‘ही’ गोष्ट, संभाषण शेअर करत म्हणाली…

चित्रा वाघ यांची रुपाली चाकणकर यांच्यावर टीका

तर चित्रा वाघ यांनीदेखील रुपाली चाकणकर यांच्याविरोधात कठोर शब्दांत टीका केली होती. “आयोगाचं काम महिलांचा सन्मान जपणं, मान राखणं आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाला जाब विचारु वाटला नाही. कारण, त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. मग, वेळ कशासाठी घालवायचा आहे. एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना सुमोटो दाखल करुन कारवाई का केली नाहीत. यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही,” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.