राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची नुकतीच चर्चा झाली. या चर्चेदरम्यान त्यांनी राष्ट्रवादीशी युती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.


सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “राजकीय प्रश्नांवर कुणाला एकत्र काम करायचं असेल, समविचारी पक्षांना एकत्र यायचं असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचे भले होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. कुठल्याही राज्याला ते हवंच आहे”. एमआयएमशी युतीबाबत राष्ट्रवादी अनुकूल असल्याचा अर्थ त्यांच्या या वक्तव्यातून काढला जात आहे.

हेही वाचा – एमआयएमची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का? जयंत पाटील म्हणतात, “ते भाजपाची बी टीम नसतील, तर..!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


एमआयएमसोबत एकत्र येण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय शिवसेनेला मान्य होईल का याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘जलील आणि टोपे यांच्या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती माझ्याकडं नाही. संपूर्ण विषय समजून घेतल्यावर त्यावर बोलणं संयुक्तिक ठरेल.’