रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीत तीन एके-४७ आढळल्या असून काही कागदपत्रेही सापडली आहेत. तसेच हरिहरेश्वर येथेही एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हायअलर्ट घोषित केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथील समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या असून यात हत्यारं आणि कागदपत्रे आढळली आहे. या बोटींमध्ये तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच २०० ते २२५ जिवंत काडतूस असल्याचीही माहिती आहे. सकाळच्या स्थानिकांच्या निदर्शना बोट आली. त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली असता, त्यात हत्यारं आढळून आली आहेत. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत दहीहंडी आणि गणपती उत्सव आहे. त्यापूर्वी ही संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी राजगड जिल्ह्यात हायअर्लट घोषित केला आहे.

हेही वाचा – पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी दिलं नवं नाव; ‘तो’ उल्लेख ऐकून सभागृहात पिकला हशा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात स्थानिक आमदार अनिकेत तटकरे यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ”आज सकाळी संशयास्पद बोट सापडली असून या बोटीत तीन एके ४७ कागदपत्रे आणि २०० ते २२५ जिवंत काडतुसे सापडली असल्याची माहिती आहे. ही घटना अतिशय गंभीर असून सरकारने याची चौकशी करावी”, असे ते म्हणाले. तर आदिती तटकरे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ”राजयगडच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयित बोट आढळून आली असून यात काही हत्यारं सापडली आहे. यासंदर्भात तत्काळ एक चौकशी समिती नेमून याची चौकशी करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.