स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद सार्ध जन्मशताब्दी समितीच्या वतीने राममंदिर अलिबाग येथे संकल्पदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वामीजींच्या जीवनावरील एक ध्वनिफीत ऐकवण्यात आली. सदर कार्यक्रम स्वामी विवेकानंद केंद्राकडून देशभरात घेण्यात आले असून विविध पाच आयामांच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचून राष्ट्राच्या एकंदर उन्नतीसाठी सदर कार्यक्रम आहे व धार्मिक श्रद्धेचा अभाव जाणवत असल्याकारणाने आजच्या युवा पिढीला नराश्याने ग्रासले आहे व या कारणाला बहुतांशी पालकवर्गही कारणीभूत असल्यामुळे त्यांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे समितीचे संयोजक दर्शन प्रभू यांनी सांगितले.  या निमित्ताने सामूहिक सूर्यनमस्कार, स्वामीजींच्या जीवनावर कीर्तने, पथनाटय़, बौद्धिक व मदानी खेळ घेणे आदींचा संकल्प करण्यात आला. स्वामीजींच्या जन्मदिनानिमित्ताने १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता अलिबाग शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.  यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत समाज प्रबोधन करण्यासाठी दर्शन प्रभू,  रघुजीराजे आंग्रे, सौ. नमिता नाईक,  प्रवीण ठाकूर, उदय शेवडे, प्रा. उदय जोशी, सौ. मानसी म्हात्रे, सौ. नीलम हजारे, विलास नाईक, दीपक रानवडे, जयंत धुळप, अभिजित आयरे, सुनील दामले, राम जोशी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami vivekanand 150 jayanti day
First published on: 03-01-2013 at 04:14 IST